March 24, 2026

वाळुज महानगर (ता.5) :- गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी (ता.3) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती व गंगापूर सहाय्यक निबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संतोष भाऊ माने, तालुका अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर निळ, ज्येष्ठ नेते कडूबा हिवाळे, ऋषिकेश पाटील, शेतकरी नेते महेश गुजर, सचिन विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अनिल बबलू पोळ, नावंदर श्रीराम, दिलीप पवार, धनराज भाऊ कहाटे, दिगंबर गोटे, चंद्रकांत चव्हाण, समाधान गायकवाड, शाहरुख पटेल, मन्साराम कहाटे, प्रदीप भानू पोळ, सोरुप ताटू, सतीश हिवाळे, मच्छिंद्र ठोंबरे, कृष्णा ताठे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदार संघात दाखल करण्यात आलेल्या अर्जात शंकरराव अण्णाराव पोळ, कडूबा हिवाळे, अनिल शंकरराव पोळ, दिलीप पवार, महेश गुजर, दिगंबर गोटे, अर्जुन तांबे, अलका कीर्तीशाही, सतीश हिवाळे, बादशहा पटेल, महेश खेडकर आदी उमेदवारांचा समावेश आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *