March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.27) – बॉईज होस्टेलमध्ये स्वतंत्र खोली घेऊन राहणाऱ्या चाळीस वर्षीय केमिकल अभियंत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. 26 सप्टेंबर रोजी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. परिणामी सिडको वाळूज महानगरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोणदिगर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील संतोष बुधा वाघ (वय 40) हा केमिकल अभियंता असून तो वाळूज औद्योगिक वसाहतीतील कास्मो फिल्म या कंपनीत काम करत होता. त्याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगी आहे. मात्र तो एकटाच सिडको वाळूज महानगर येथील जय बॉईज हॉस्टेलमध्ये स्वतंत्र खोली घेऊन राहत होता. संतोष वाघ यांचा फोन लागत नसल्याने त्याच्या भावाने होस्टेल मालकास शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी फोन करून विचारणा केली असता होस्टेल मालकाने संतोष वाघ याच्या खोलीत जाऊन पाहिले. त्यावेळी संतोष वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *