वाळूजमहानगर, (ता.28) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, निलेश म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी उपस्थित निलेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कार्यक्रमात विध्यार्थ्यानी शिस्तबद्ध अशी कवायत सादर केली. त्याच बरोबर प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून भारतीय संविधान कधी आणि कुणी लिहिले. या बद्दल माहिती सांगितली. बालवर्गातील यशस्वी कदम व अवनी शेजवळ या विद्यार्थिनींनी “देस रंगीला” या गाण्यावर नृत्य केले. बालवर्गातील विद्यार्थांनी विविध राज्यातील वेशभूषा प्रधान करून आपली भारतीय संस्कृती दर्शिविली, आणि ” विविधता मध्ये एकता ” असा संदेशही दिला. यावेळी शिक्षिका वीणा कन्नावार यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती दिली. सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, मधूश्री डाके, रुपाली चौधरी, सुवर्णा जोशी, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
