March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सह्याद्री स्कूलचे संचालक प्रभाकर म्हस्के, किड्स केंब्रिज स्कूलच्या संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा कोते यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रभाकर म्हस्के म्हणाले की, 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणूनही ओळखला जातो. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, वंदना कदम, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, कुणाल शिंदे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *