March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.13) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सह्याद्री स्कूलचे संचालक प्रभाकर म्हस्के, संचालिका निर्मला म्हस्के आणि मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमानिमित्त बाल वर्गातील विद्यार्थिनी संघर्षिका पंडित, अवनी हरक, तनुजा झळके, पूर्वा शेटे, रेणुका आढाव, संस्कृती बावसकर, देवर्षी इंगोले या राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत तर विद्यार्थी विहान लोंढे, मयूर तांबे, देवांश उदावंत, आदित्य यशवंत हे स्वामी विवेकानंद यांच्या वेशात उपस्थित होते. विद्यार्थांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी भाषणे दिली. शिक्षिका भाग्यश्री मुळे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मुलांना विशेष माहिती सांगितली. यावेळी सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, शीतल चौधरी, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, राणी कांबळे, सरला रोडगे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *