March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दीनानिम्मित अभिवादन करण्यात आले. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के यांची उपस्थिती होती.

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरात 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून किड्स केंब्रिज स्कूलमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावर, सुवर्णा कदम, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, राणी कांबळे, सरळ रोडगे, सई राणे, कुणाल शिंदे उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *