March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.26) – अंकुर शिक्षण संस्था संचालित ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कुलमध्ये शिक्षक पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के व मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांच्या अभ्यास विषयी काय अडचणी आहेत या बद्दल चर्चा करण्यात आली. नवीन अभ्यासक्रम बद्दल मार्गदर्शन केले तसेच मुलांच्या भावी करियर विषयी महत्व पूर्ण माहिती देण्यात आली. पालकांनीही मुलांच्या विषयी येणाऱ्या अडचणी मांडल्या. यावेळी सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कन्नवार, मोनिका चतुर्भुज, भाग्यश्री मुळे, मयुरी पवार, सरिता डावखर, सुवर्णा कदम, सरला रोडगे, राणी कांबळे, सई राणे, कुणाल शिंदे यांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *