
वाळुज महानगर (ता.9)- सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलची भाजी मंडई मध्ये भेट देण्यात आली. यावेळी निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील उपस्थित होत्या. यावेळी लहान लहान मुलांनी भाजी आणि फळे यांची प्रत्येक्षात नेहाळणी करून अनुभव घेतला.

या भेटीत विद्यार्थ्यांना काकडी, भेंडी, फुलकोबी, गट्टा कोबी, टमाटे, बटाटे अशा वेगवेगळ्या भाज्यांची, फळाची ओळख व्हावी, त्यातील रंगाचा, आकारचा फरक कळावा. हा उद्देश ठेऊन या मार्केट डे चे आयोजन केले होते. चिमुकल्यानी बऱ्याच भाज्यांची आणि फळाची ओळख पटवून दिली आणि हा सगळा अनुभव घेतल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी आणि रुपाली उपळकर यांची उपस्थिती होती.
