वाळूजमहानगर, ता.25 – कोकरु न दिल्याच्या कारणावरून एका 36 वर्षीय मेढपाळास दोन जणांनी माराहण करून एक कोकरू व खिशातील 5 हजार रुपये काढून पोबरा केला. ही घटना कासोडा शिवारात मंगळवारी (ता. 21)रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली.
शिवाजी बाबसाहेब वाघमोडे (रा. दिंडेवाडी ता.शेवगाव जि. अहिल्यानगर) या मेढपाळाने कासोडा शिवारातील हरिभाऊ काजळे याच्या शेतात आखाडा घातला आहे. वाघमोडे हे पत्नी, बहिण यांच्यासह तेथे राहतात. मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शिवाजी वाघमोडे हे मेढ्यासाठी जाळे लावत होते. त्यावेळी त्याच्या तोड ओळखीचा बाळू भानुदास देवगुने व कैलास करडे हे दोघे तेथे आले. त्यांनी वाघमोडे यास मेढीचे एक कोकरू मागीतले असता त्यांनी नकार दिली. त्यामुळे देवगुने व त्याच्या मित्राने वाघमोडे यास मारहाण करून एक कोकरू व खिशातील 5 हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावले. तसेच याबाबद कोणास काही सांगितल्यास वाघमोडे यांना जिवे मारण्याची घमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.