
वाळूजमहानगर, (ता.16) – लिंबे जळगावकडून वाळूजकडे येणाऱ्या दुचाकीला एका अज्ञात चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता.16) रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वाळूजजवळ सरदारजीच्या धाब्याजवळ झाला. जखमीला लिंबे जळगाव पॉईंटवर 24 तास सेवेत असणारी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या ॲम्बुलन्सने जिल्हा रुग्णालय (घाटी) त दाखल केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाळासाहेब नारायण थोरात (टेलर) वय 42 वर्ष, रा. मनिषानगर, वाळूज हा गुरुवारी (ता.16) रोजी लिंबे जळगावकडून वाळूजला येत असताना सरदारजी हॉटेलजवळ अज्ञात चार चाकी गाडीने बाळासाहेब थोरात यांच्या दुचाकी (एमएच 20,ए जी -2782) ला जोरात धडक देऊन पसार झाली. सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये दुचाकी स्वार बाळासाहेब थोरात गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या विनामूल्य ॲम्बुलन्सने अपघातग्रस्त बाळासाहेब थोरातला लोकांच्या मदतीने शिफ्ट करून जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.
