
वाळूजमहानगर (ता.24) – वाळुज औद्योगिक वसाहतीतून संभाजीनगरकडे एका पाठोपाठ जाणाऱ्या दुचाकी आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात धडक होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात वाळूज महामार्ग वरील गोलवाडी शिवारात शुक्रवारी (ता.24) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी (एम एच 20, ई एक्स-5295)
स्वाराने समोरील स्विफ्ट डिझायर कार (एम एच 02, सी व्ही-1495) ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील गोलवाडी शिवारात शुक्रवारी (ता.24) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कार आणि दुचाकी अशा दोन्हीहीवाहनाचे मोठे नुकसान झाले असून सायलू कोंदेवाड असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते आहे.
