
वाळूजमहानगर, ता.12 (बातमीदार) – दारूच्या नशेत तर्रर होऊन हायगायी व निष्काळजीपणाने कार चालवल्याने ती दुभाजकाला धडकली. यात चालक जखमी झाला. हा अपघात बुधवारी रोजी वाळूज परिसरातील खवड्या डोंगराजवळ झाला. या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार शेखर गंगाधर राऊतवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार (एम एच 20, एफ जी – 6581) चा चालक आरोपी प्रवीण बाळचंद गोरे यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
