
वाळूज महानगर, (ता.10) – भरधाव जाणारी कार आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तीन जण जखमी झाले. हा अपघात करमाड येथील साक्षी हॉटेल समोर शनिवारी 10 जानेवारी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, करमाडकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी दुचाकी (एम एच 20, एफ आर-3658) व जालन्याकडून येणाऱ्या कार (एम एच 28, सी सी -1225) यांच्यात जोराची धडक झाली. शनिवारी 10 जानेवारी दुपारी 12:45 वाजेच्या सुमारास करमाड येथील साक्षी हॉटेल समोर झालेल्या या अपघातात हर्षद सुनील सोनवणे वय 9 वर्ष, रा. गंगापूर जिल्हा संभाजीनगर, सुनील राजेंद्र सोनवणे वय (43) वर्ष रा. राजेवाडी ता. जि. जालना, सपना सुनील सोनवणे वय 30 वर्ष हे जखमी झाले. 
सर्व जखमींना संभाजीनगर जालना हवे करमाड पॉईंट जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज्धाम 24 तास विनामूल्य अंबुलन्स चालक बाळू अंकुश कातखडे यांनी कुंबेफळ आदर्श हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
