March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – कागदपत्रे सोबत न बाळगता विना क्रमांक दुचाकीवर फिरणाऱ्या दोन दुचाकी धारकांविरुद्ध रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, पोना.धिरज काबलिये, पोकॉ.गणेश सागरे आदींची पथक सोमवारी रात्री परिसरात गस्त घालत होते.

या गस्तीदरम्यान बजाजनगरात एक इसम विना क्रमांकाच्या दुचाकीवरुन फिरत असल्याचे रात्री 11 वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. या संशियत दुचाकीस्वाराची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव वाल्मिक चंदु चव्हाण (27), रा.विटावा, ता.गंगापूर असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातुन 40 हजार रुपये किमंतीची विना क्रमांकाची दुचाकी जप्त करुन गुन्हा दाखल केला. दुस-या घटनेत पहाटे 3 वाजेच्या सुमारास पंढरपूरातील नुराणी मस्जीद समोरील रोडवरुन दुचाकीवरुन फिरणा-या संशयित दुचाकीस्वारास पोलीसांनी हटकडले. दत्ता सिताराम जंजाळ (35), रा.रांजणगाव या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या दुचाकी ( एम.एच.20, सी.एल.-2277)च्या कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यामुळे या दुचाकीस्वाराविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *