वाळूजमहानगर, ता.7 – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या गाईची वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी पकडून त्याच्या ताब्यातून जवळजवळ साडेलाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ते वाळुज रोडवर मंगळवारी (ता.7) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अंमलदार जयश साळुंके व सहकारी कर्मचारी गस्त घालत असताना माहीती मिळाली की, एक पांढ-या रंगाचे चारचाकी वाहन अवैधपणे गोवशं जातीचे गायी वाळुज रोडने छत्रपतीसंभाजीनगरकडे घेऊन जात आहे. माहितीवरून छत्रपती संभाजीनगर ते वाळुज रोडवर सापळा रचला. सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास पांढ- या रंगाचा बोलेरो पिकअप (एम एच 20, जी सी -8176) येतांना दिसला. 
तो थांबवून पाहणी केली असता त्यात 8 गायी क्रुरपणे दोरीने बांधलेली दिसल्याने तसेच त्यांच्या मालकी हक्काबाबत दाखले नसल्याने गायीसह बोलेरो पिकअप पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अंमलदार जयश वसंतराव साळुंके यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक शोएब अहमद कुरेशी (वय 22) रा-सिल्लेखाना कुरेशी मस्जीदजवळ छत्रपती संभाजीनगर याच्या वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त –
या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या वर्णनाच्या व किमतीच्या 8 गायी तसेच 3 लाख रुपये किमंतीचा एक पांढ-या रंगाचा महिन्द्रा बोलेरो मॅक्स पिकअप असा एकूण 4 लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेल्या गायी गो शाळेत –
या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या 45 हजार रुपये किमतीच्या 8 गायी देखभालीसाठी श्रीमहाविर जैन स्थानक वासी जैन गोशाळा जालना रोड चिकलठाणा येथे सुरक्षेच्या दृष्टीने दाखल करण्यात आल्या.
प्राण्यांना क्रुरतेची वागणूक –
कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या या गायीची वाहतूक करताना आरोपीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या विरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतीबंध करण्याबाबत अधिनयम -1960 चे कलम 11 (1), (घ)(ड)(च) तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा -1976 कलम 5 (ब). 9 तसेच मोटार वाहन अधिनयम 1988 कलम 66,192 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 कलम 124 अन्वये गुन्हा होत असल्याने आरोपी शोएब अहमद कुरेशी याच्याविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला.
