
वाळूजमहानगर, (ता.16))- वाळूज औद्योगिक वसाहतीतील शाईन टेक इंडस्ट्रीज या कंपनीतील विविध स्पेअर पार्टची चोरी करणारा आरोपी जेरबंद करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील गट नंबर मधील गौरव निकम यांच्या शाईन टेक इंडस्ट्रीज या कपंनीतुन 10 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी 2 हजार 746 किलो वजानाचे 5 लाख 30 हजाराचे मेटेरिअयल चोरी केले होते. या बाबाद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असतांना पोउपनि दिपक रोठे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ही चोरी करणारा आरोपी घाणेगाव येथील सर्घषनगर येथे राहतो. त्यानुसार पथकासह सपळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्यास नाव गाव विचारले असता संतोष भिमराव कांबळे असे सांगितले. चोरी बाबद विचारपुस केली असता साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली देत,भंगार दुकानदार अमन मुक्तार शेख रा. रांजणगाव याल्या विकल्याचे सांगितले. शेख याच्या ताब्यातुन 497 किलो वजानाचे लोखंडी मटेरीयल असा 2 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यातील फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविनाश अघाव, दुय्यम निरिक्षक गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाचे सपोनि. गोतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, पोहका धिरज काबलीये, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, नितीन इनामे, सतवंत साहळे, हुनमान ठोके, सुरजकुमार अग्रवाल, सुरेश कचे आदिनी केली.
