February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – आपापसात संगणमत करुन जेसीबीच्या सहाय्याने नवनिर्माणाधिन कपंनीची अंदाजे 300 फुट लांब व 8 फुट उंचीची संरक्षक भित तोडुन जमिनदोस्त करुन नऊ लाख रुपयाचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ करुन कोणी अडवले जीवे मारण्याची धमकी देत कंपनीच्या जागेवर अतिक्रमण केल्याने 10 ते 15 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संकज ग्रुप या कंपनीने 2021 मध्ये वाळुज परिसरातील रहीमपुर शिवार गट क्र. 9 मध्ये पंढरीनाथ रामनाथ गंडे यांची 5 एकर 6 गुठे जमीन खरेदी केली होती. या जागेवर संकज ग्रुप तर्फे मे संकज फोर्जीग प्रायव्हेट लिमिटेड या युनिटचे शेड उभारले आहे. जमीनीच्या चारही बाजुने संरक्षक भिंतीचे काम चालु आहे. येथे दोन सिक्युरीटी गार्ड असून पर्चेस व स्टोअरचे काम वैभव शिवनकर हे पाहतात. मंगळवारी (ता.20) रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमरास मिर्झा बेग व इतर 10 ते 15 अनोळखी कंपनीची संरक्षक भिंत जेसीबी (एम एच 20,जीई-6951)च्या सहाय्याने तोडत असताना तेथील सिक्युरीटी गार्ड मी विरोध केला. त्यामुळे आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत कोणी अडवीले तर जेसीबी अंगावर घालू ,हातपाय तोडून टाकू.अशी जीवे मारण्याची धमकी देत संरक्षक भिंत पुर्णपणे तोडून जमीनदोस्त केली. व कंपनीचे नऊ लाख रुपयाचे नुकसान केले. तसेच लिंबजळगाव ते रहीमपुर रस्ता खोल खोदुन बंद करून अंदाजे 10 फुट कंपनीच्या जागेच्या आतमध्ये सिमेटचे पोल लावून अतिक्रमण केले. याप्रकरणी कंपनीच्या वतीने जनरल मॅनेजर रमेश सारंगधर औरादकर यांच्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी मिर्झा बेग व इतर 10 ते 15 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *