March 25, 2026

वाळूज महानगर, (ता.9) – रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात शनिवारी (ता.9) रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकात झाला.

गती या कुरियरचा कंटेनर (एम एच 14, डी एम – 9647) वाळुजकडून औद्योगिक वसाहतीत जात होता. त्याचवेळी अंदाजे 50 वर्षीय अनोळखी महिला पादचारी रस्ता ओलांडत असताना या कंटेनरने तिला जोराची धडक दिली. शनिवारी (ता.9) रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात महिलेच्या दोन्ही पायांना मार लागून ती गंभीर जखमी झाली. या जखमी अनोळखी महिलेला वाहतूक शाखा व वाळुज एमआयडीसी पोलिसांसह प्रत्यक्षदर्शींनी रुग्णवाहिकला पाचारण करत उपचारार्थ दाखल केले. मात्र तिचे नाव, गाव समजू शकले नाही. अपघातानंतर कंटेनर चालक घटना स्थळावरून फरार झाला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *