March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – ओर्चीड जुनिअर कॉलेजच्या विद्याथ्यांनी एचएससी परीक्षेत मारली बाजी. एकाच ठिकाणी कॉलेज आणि कोचिंग असणार्या कॉलेजने 100 टक्के निकाल देत विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा गुरुवारी (ता.25) रोजी निकाल जाहीर करण्यात आला. बजाजनगरातील ओर्चीड कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. या महाविद्यालयाच्या प्रथमेश सामृत याने 91.50 टक्के, कल्याणी गाडे 89 टक्के, निकिता यादव 88 टक्के, ओंकार आघाव 87.67 टक्के, वैभव घुले 87.67 टक्के, प्रणव चव्हाण 87.33, साक्षी रौंदळ 85.50, साक्षी निकम 85 टक्के, रुबी तिवारी 83 टक्के, मंगेश शिंपी 83 टक्के गुण मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदामुरी, प्राचार्य व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थाचे अभिनंदन व कौतुक केले. भावी वाटचाली साठी शुभेछा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *