
वाळूजमहानगर, (ता.23) – बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविदयालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या तृतीय वर्षात शिकणारा सौरभ बळीराम ओतारी या विद्यार्थ्यांची फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च, सांगोला जि. सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशाख विदयापीठ, लोणेरे जि. रायगड, याच्या मार्फत देण्यात आलेल्या क्रिडा स्पर्धेमध्ये इंटरझोनल कुस्ती 92 किलो वजनगट या स्पर्धेमध्ये विजयी होउन नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी सौरभ ओतारी याची निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव व संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी स्वागत करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. गोविंद ढगे, मॅकेनिकल विभाग प्रमुख प्रा. अमोल अडकिणे, सिव्हील विभाग प्रमुख प्रा. एच.एफ. सिध्दीकी, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. प्रताप मोहिते, प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. भावना पिंगळे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रा. जनार्धन भोर, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव, क्रीडा प्रशिक्षक ए. बी. शिंदे यांच्यासह प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सौरभ ओतारी याचे स्वागत केले.
