वाळूज महानगर, ता.31 – झारखंड येथे नुकत्याच झालेल्या सी बी एस ई राष्ट्रीय आंतरशालेय जुडो स्पर्धेमध्ये तसेच रत्नागिरी इथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 44 कि.ग्रा वजन गटात ऑर्किड टेक्नो स्कूलच्या श्रुतकिर्ती मीननाथ खलाटे हिने 2 सुवर्ण पदकांची कमाई केली
या यशाबद्दल ऑर्किड टेक्नो स्कूलचे संचालक श्रीनिवास नंदमुरी, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सचिन बोर्डे, प्राचार्य अंजुम शेख, रेणुका काकडे, विकास ओबेराय, कविता राठी यांनी श्रुतकिर्तीचे स्वागत केले. तिला क्रीडा शिक्षक देविदास जैस्वाल, सचिन कसारे यांचे मार्गदर्शन लाभले.