
वाळूजमहानगर, (ता.26) – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसच्या बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूल मधील तेजस्विनी विक्रम खरात व सौरव संतोष गायकवाड या दोन विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत पुढील शिक्षणासाठी पात्र झाले आहेत.

बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसमधील शिक्षकांनी या परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून विशेष तयारी करून घेत मार्गदर्शन केले. तसेच नीट, जी -(मेन/ऍडव्हान्सड), सी ए फॉउंडेशन, स्कॉलरशिप, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू आहे. इन्स्टिट्यूशनसमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेबरोबर विविध क्रीडा स्पर्धेत यशाचा ठसा उमटवत आहेत.
विद्यार्थ्याच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व शिक्षक, तसेच पालकांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.
