
वाळूजमहानगर, (ता.11) – बजाजनगर येथील ऑर्किड टेक्नो स्कूल व ऑर्किड इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महापुरुष व कर्तबगार महिला विषयी मार्गदर्शन, विद्यार्थी विद्यार्थिनींची भाषणे, महिलांसाठी नृत्य व विविध स्पर्धा व बक्षीस वितरण आदी विविध कार्यक्रम घेऊन जागतिक महिला दिन शनिवारी (ता.8) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाचे उद्घाटन निकिता जाधवराव-ढमढेरे, उषाताई हांडे, सीमा इंगळे जयश्री घाडगे, गीता गावंडे, टीना ओबेरॉय, लता श्रीनिवास नंदमुरी, शाळेच्या मुख्याध्यापिका शेख अंजूम बानो, मुख्याध्यापिका रेणुका काकडे, सविता बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिला सशक्ततीकरण, नारीशक्ति, महिला सुरक्षा व आजच्या परिस्थितीत महिलेचा प्रत्येक ठिकाणी उच्चांक पाहता भारतातील महिला पंतप्रधान, राष्ट्रपती, आयपीएस, आयएएस, पीआय, पीएसआय, आमदार, खासदार, शिक्षण श्रेत्रात , सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात महिला यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध वेषभूषा परिधान करून भाषणे करत समाजात समता, एकात्मतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक-शिक्षिका तसेस शिक्षेकतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
