March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.8 – ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स सिडको वाळूज महानगर-1 येथे ऑर्किड टेलेंट सर्च स्कॉलरशिप परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी (ता.7) रोजी मोठ्या उत्साहात झाला.

ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने त्यांच्या ऑर्किड टॅलेंट स्कॉलरशिप परीक्षेचा (ओटीएसइ 2025) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत जवळजवळ 80 शाळेचे 6 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना पारितोषिक देण्यात आले. यात लॅपटॉप – आरुष कांगुणे, टॅब्लेट पीसी – युवराज राठोड, 5 जी सेलफोन – स्वाती शेजुळ, 15 विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, 100 विद्यार्थ्यांना स्टडी बॅग आणि 200 विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडसह प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने बोर्ड परीक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *