
वाळूज महानगर – बजाजनगर येथील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या सीए फाउंडेशन (CA FOUNDATION) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत रितेश कृष्णा धोत्रे -278, अजित जनार्धन निकम-242, चैतन्य नरेंद्र गुरव-240 या तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत गुण मिळवून मराठवाड्यातून उच्च यश संपादन केले. सीए फाउंडेशन परीक्षेत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यशाचा पाठ पुरावा करून अभिमानास्पद कामगिरी केली. विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ऑर्किड संस्थेच्या वतीने चेअरमन श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक यांनी कौतुक करून स्वागत केले. तसेस या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
