
वाळूजमहानगर, (ता.3) :- क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या अंतर्गत आयोजित तालुका स्तरीय शालेय जिल्हा व्हॉलीबॉल स्पर्धेत एम.जी.एम. संस्कार विद्यालयाच्या मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले.
सांस्थेच्या संचालिका डॉ अपर्णा कक्कड, उपसंचालिका नम्रता जाजू, प्रशासक सुषमा मोहिते, मल्लिका नायर, विद्यालयाचे मुख्यद्यापक सचिन मैंड, स्मिता कुलकर्णी, नूतन देशपांडे, घनश्याम जाधव, आश्विनी दाशरथे, एम.जी.एम.संस्कार विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच क्रीडा शिक्षक प्रा. कैलास जाधव यांनी या खेळाडूंचे स्वागत केले.
खेळाडू खालीलप्रमाणे :- कर्णधार कु. साक्षी काकडे, कु.अंबिका देशमुख, कु. अनुष्का घाले, कु. साक्षी मुसाळे, कु.किरण कुशवाह, कु.सृती शिंदे, कु. प्रीती शिनगारे यांनी व्हॉलिबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. या खेळाडूंचे बजाजनगर परिसरात सर्वत्र कौतुक होत असून या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. कैलास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
…….
