वाळूज महानगर, (ता 19) – एकाच कुटुंबातील पती-पत्नी व पाच वर्षीय मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. वाळूज परिसरातील हृदय पिळवटून टाकणारी ही घटना वळदगाव येथे शुक्रवारी तारीख 19 रोजी सकाळी उघडकीस आली.
बाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील वळदगाव येथे मोहन प्रतापसिंग डांगर वय 30, पूजा मोहन डांगर वय 25 व श्रेया वय पाच वर्ष असे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आलेल्यांची नावे आहेत.
मोहन डांगर हे वळदगाव येथे भाड्याच्या घरात राहून शेती करत होते. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
घटनेपूर्वी गुरुवारी कुटुंब जेवण करून रात्री झोपले, त्यानंतर रात्री हा अत्यंत हृदय मिळवटून टाकणारा प्रकार घडला. सासर माहेर एकाच गावात असलेल्या पूजाची मुलगी श्रेया ही दररोज सकाळी शेजारीच राहणाऱ्या आजीकडे जात असते. शुक्रवारी सकाळी मात्र ती न आल्याने आजी तिला पाहण्यासाठी डांगर यांच्या त्यांच्या घराकडे गेली असता घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांचेही मृतदेह घाटीत रवाना केले.
https://youtu.be/nUZh_IwYhW0
मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.
