
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली देशात 1 कोटी वृक्षारोपण व संवर्धन अभियान राबाविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरूवात टेंभापुरी येथे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन भाऊ यांच्या हस्ते लिंब, पिंपळ, वड, चिंच, नारळ अशा अनेक प्रजातीच्या रोपांची लागवड करून अभियानास सुरुवात झाली.
बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख श्री नितिन भाऊ यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विद्यार्थी व युवक यांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.
“पर्यावरण” विषयावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या संभाजीनगर, टेम्भापुरी भागातील सेवेकरी, प्रतिनिधी तसेच बालसंस्कार वर्गातील मुले, युवा वर्गाने वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प केला व वृक्षारोपणही केले.

संभाजीनगर येथे झालेल्या वृक्षारोपण अभियानात कृषी विद्यापीठ,परभणी चे माजी कुलगुरू अशोक ढवन यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाच्या निमित्ताने हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
हा संकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी राज्यातील नाशिक, बीड, पुणे,जळगाव,अहमदनगर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सेवेकरी वृक्षारोपनास सुरुवात करतील.
या महावृक्षारोपन अभियानास राज्यासह देशात दररोज हजारो झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
हे अभियान पर्यावरण रक्षणासाठी महत्वाचे ठरणार असल्याने जास्तीत जास्त वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्याचे आवाहन सेवा कार्याच्या वतीने करण्यात येत आहे.
