February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) :- येत्या काही दिवसात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कामासाठी सुरू असलेली ऑनलाईन प्रक्रिया नेहमी बंद पडत असल्याने निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारा. अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष माने यांनी केली आहे.

गंगापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांना सध्या गंगापूर तालुक्यातील होत असलेल्या 32 ग्रामपंचायत निवडणूक निमित्त नाम निर्देशन ऑनलाईन चालू होते.
परंतु मागील 2 दिवसा पासून निवडणूक विभागाची वेबसाईट बंद पडत असल्याने उमेदवार मध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे युवा नेते संतोष भाऊ माने यांनी तहसीलदार सतीश सोनी यांना निवेदन देण्यात आले व उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्यात यावा. अशी ही मागणी केली. या निवेदनाची त्वरित शासनाने दखल घेत ऑफ लाईन फॉर्म स्वीकारण्यास परवानगी दिली. या वेळी उपस्थित संजय भाऊ जाधव, समाधान भाऊ गायकवाड, भाऊसाहेब गवळी, सोपान देशमुख , ॲड. भाऊसाहेब जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *