
वाळूजमहानगर, (ता.23) – उद्योजक संदीप कचरू गिरे यांच्या ’24X7 पेस्ट मॅनेजमेंट सर्विसेस’ या कंपनीला “प्राइड ऑफ नेशन”-मोस्ट एडमायर पेस्ट मॅनेजमेंट कंपनी इन औरंगाबाद महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एन डी एम सी कन्वेंशन सेंटर नवी दिल्ली येथे 8 फेब्रुवारी 2023 रोजी हा कार्यक्रम झाला.
हा पुरस्कार त्यांना टोकियो जपानचे प्रसिद्ध उद्योजक मि.मासहितो नाकायशी फाउंडर ऑफ ग्लेन्कल टेक्नोलॉजी को.लिमिटेड व मिसेस माईनो सेटो ग्लेन्कल को.लिमिटेडच्या संचालिका यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी ब्रांड सोलुशनचे एमडी अभिजीत राजपूत व वाईस प्रेसिडेंट अंजू अरोरा उपस्थित होते. हा पुरस्कार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योजकांना देण्यात आला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फक्त 30 उद्योजकांचीच निवड यामध्ये करण्यात आली होती. ज्यामध्ये संदीप गिरे हे औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव उद्योजक होते. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
