
वाळुज महानगर (ता.02)- छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवर दिव्यांग व्यक्तीच्या तीन चाकी वाहनाला अपघात होऊन दिव्यांग व्यक्ती जखमी झाला. त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी (ता.2) रोजी ईसारवाडी फाटा येथे सायंकाळी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जगदीश बंसीदास बैरागी वय 41 वर्ष रा. छत्रपती संभाजीनगर हे दिव्यांग व्यक्ती त्यांच्या तीन चाकी (एम एच 14, एच ए -9642) वाहनावरून नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. त्यांच्या तीन चाकी वाहनाला ईसारवाडी फाट्यावर अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज नाणीज धामच्या रुग्णवायकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी त्वरित अपघातस्थळी हजर होऊन अपघातग्रस्त दिव्यांग व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
