वाळूजमहानगर, (ता.15) – खात्री होताच पंटरने इशारा केला आणि विना परवाना व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी हॉटेल चालक, मॅनेजर व एजंट यांच्यासह चार पीडित महिलां तसेच ग्राहक यांना ताब्यात घेऊन हॉटेल मधून जवळजवळ अर्ध्या लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने गुरुवारी (ता.15) रोजी बजाजनगर येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओम साई हाँटेल, कोलगेट चौकाजवळील लाँजवर 4, 5 महिला देहव्यापार करत आहे, मदत पाठवा. अशी माहिती निनावी फोन द्वारे गुरुवारी (ता.15) रोजी दुपारी
मिळाल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी एका पेंटरला बनावट ग्राहक बनवून पाठवले. आणि खात्री होताच तेथे छापा टाकला.
त्यावेळी हाँटेल /लाँज चालविणार्यासह हाँटेल मँनेजर, वेश्यगमणासाठी ग्राहक आणणारा एजंट हे महिलांना वेश्यागमन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना ग्राहकांसोबत संभोगासाठी जागा उपलब्ध करुन देवून कुंटनखाना चालवून आपली उपजिवीका भागवित असतांना मिळून आले. या प्रकरणी गणेश रामभाऊ सागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंटनखाना चालविणाऱ्यासह, हॉटेल मॅनेजर, एजंट असे तीन पुरूष व वेश्यागमनासाठी आलेला ग्राहक यांच्याविरूध्द स्ञियांचा व मुलींचा अनैतीक व्यापारास प्रतिबंधक अधिनियम, 1956 (पिटा अॅक्ट) कलम 3, 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. राहूल निर्वळ करत आहेत.
आरोपींमध्ये यांचा समावेश –
कुंटनखाना (हाँटेल/लाँज) चालविणारा अप्पासाहेब महादेव खेडकर, (वय 46) रा. साईश्रध्दा पार्क हौ.सो., बजाजनगर, मँनेजर निळकंठ बाळासाहेब शिंगणे, (वय 42), रा. लाडनांद्रा, ता. सेलु, जि. परभणी. (ह.मु. ओम साई हाँटेल, कोलगेट चौक, बाजजनगर, वेश्यगमणासाठी ग्राहक आणणारा एजंट योगेश भोजु जाधव, (वय 25) रा. नंदगाव तांडा, ता. किनवट, जि. नांदेड (ह.मु. देवळाई चौक, सेवालालनगर, लताबाई राठोड यांच्याकडे किरायाणे), वेश्यागमनासाठी कुंटनखान्यावर आलेला ग्राहक धरमसिंग महाजन जंघाळे (वय 27), रा. पाचपीरवाडी, ता. गंगापूर, (ह.मु. पोलीस काँलनी, खेडकर यांच्याकडे किरायाने, पडेगाव, छञपती संभाजीनगर) व पिडीत 4 महिला यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन लाँजमधील रूमच्या झडतीत मिळून आलेले कंडोमचे पाकीटे, मोबाईल व 51 हजार 200 रुपये रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उप आयुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोउपनि. चेतन ओगले, अविनाश ढगे, गणेश सागरे, पंकज साळवे, सुरेश भिसे, महिला पोलीस प्रियंका तळवंदे यांनी केली.
