March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.3) – राहत्या घरी इलेक्ट्रिक शॉक लागल्याने बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ दाखल केलेल्या एका 74 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना दिघी /काळेगाव येथे बुधवारी (ता.3) रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघी /काळेगाव येथील उमराज देवचंद साध्ये वय 74 यास बुधवारी (ता.3) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास राहत्या घरी इलेक्ट्रिक शॉक लागला. त्यांना बेशुद्ध अवस्थेत तुळशीराम उमराज साध्ये व ऋषिकेश बाळासाहेब साध्ये यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी 4.45 वाजेच्या सुमारास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी घाटी मेडिकल पोलीस चौकीचे सी. बी. सानप यांनी दिलेल्या माहितीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ खोसरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *