March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.1) – शेंदूरवादा येथे जबरी चोरी करताना 78 वर्षीय वृद्धाचा डोक्यात प्रहार करून खून करण्यात आला होता. तसेच महिलांच्या दांगावरील सोन्याचे दागिने ओरडून नेले होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा सर्वांगांनी तपास केला. मात्र तपास लागतात लागत नव्हता. अखेर दुचाकी चोरीच्या तपासाने या गुन्ह्याची उकल झाली. आणि वाळूज पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना जेरबंद केले.

           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंदुरवादा येथे 26 मे 2024 रोजी जबरी चोरी करतांना 78 वर्षीय नारायण पंढरीनाथ निकम यांचा डोक्यात प्रहार करुन अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला होता. तसेच त्यांच्या सुनबाईला देखील मारहाण करुन अंगावरील दागीणे अक्षरशः ओरबाडुन नेण्यात आले होते. याप्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना वाळुज पोलीसांनी संपुर्ण परिसर पिंजून काढला. हद्दीतील आणि बाहेरील गुन्हेगारांची पडताळणी केली. तसेच गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली. वाळुज पोलीस, गुन्हे शाखा, अशी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच मृतकाचे वैयक्तिक वैमनस्य, मालमत्तेचे वाद तसेच चोरीच्या उद्देशाने करण्यात आलेला खुन अशा सर्व अंगानी गुन्ह्याचा तपास करण्यात आला होता. परंतु काही केल्या गुन्हा उघडीक येत नव्हता. त्यामुळे वाळुज पोलीसांसमोर मोठे अव्हान उभे राहीले होते.


असा लागला छडा –
लोणार जिल्हा बुलढाणा येथे खुन व जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली होती. हे आरोपी बोरुडी गायराण सावखेडा व डोमेगाव ता. गंगापुर येथील रहवासी आहेत. त्यांनी लोणार भागात अनेक गुन्हे केले. एका वयोवृध्द नागरीकाचा खुन करुन त्यांची लोणार येथुन दुचाकी चोरून आणलेली होती. ती वाळुज येथे एका ठिकाणी सोडुन तेथुन दुसरी दुचाकी आरोपीनी चोरुन नेली होती. या दुचाकी चोरीचा तपास वाळुज पोलीस ठाण्याचे विशेष पथक अधिकारी पोउपनि अजय शितोळे व त्यांचे सहकारी करत होते. या तपासात शेंदूरवादा येथील खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली असुन आरोपी महेश कांचा काळे रा. बोरुडी गायराण सावखेडा व मंजु काताराज पवार रा. डोमेगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांना बुलढाणा कारागृह येथून ताब्यात घेवुन निकम यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर आरोपींना पोलीस खाक्या दाखवतात त्यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्याचा घटनाक्रम सांगीतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडुन चोरीस गेलेले सोन्याचे दागीणे जप्त केले. हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने करण्यात आला असल्याचे उघडकीस आले आहे. 

यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस उप निरीक्षक अजय शितोळे, पोह. संदिप धनेधर, पोअं. विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, स्नेहलकुमार गवळी व पोलीस मित्र अमन शेख, किशोर गाडेकर यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *