
वाळूजमहानगर, (ता.23) – वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजीनियरिंग अँड मनजमेंट महाविद्यालयात दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. “अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रेरणादायी नवकल्पना” हा परिषदेचा विषय होता. ही परिषद अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदान व भविष्यातील तांत्रिक आव्हाने यावर केंद्रीत होती.
या परिषदेसाठी तज्ञ म्हणून नायजेरीयन विद्यापीठाचे डॉ. व्हिक्टर एस ऐगबोडीओन, मलेशियातील मलाया विद्यापीठाच्या डाॅ. झायरा झमन, बांगलादेशातील चित्तगांग विद्यापीठाचे डाॅ. रशीद मुस्तफा या सर्वांचे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभले. या परिषदेसाठी भारतातील सुमारे 100 व आंतरराष्ट्रीय 9 शोधनिबंध सादर करण्यात आले.
एन्ड्रेस हाऊजरचे एम.डी. श्रीकांत नारायनण यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी सर्वांना प्रमाणपत्र प्रदान आले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. समीर जोशी, प्रा. समीना खान, प्रा. दिपाली केंडे, प्रा. जफर हसन, प्रा. सायली देशमुख, डाॅ. गौतम शहा, उपप्राचार्य हेमंत जाधव व सर्व विभागातील समन्वयक यांनी काम पाहिले.
परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, सचिव दिलीप सारडा, विश्वस्त डाॅ. कल्पना झवर आणि संचालक डॉ. आर. एस. जहागिरदार व डॉ. सि. एस. पद्मावत यांनी सर्वांचे स्वागत केले.
