
वाळुज महानगर, (ता.17)- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे मटेरियल मॅनेजमेंट सप्ताहाचे आयोजन 18 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान करण्यात आले आहे. प्रतिवर्षी हा सप्ताह देशभरातील विविध शाखांमार्फत साजरा केला जातो.
साहित्य व्यवस्थापन तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योग क्षेत्रातील विविध कर्मचाऱ्यांसाठी याद्वारे व्याख्यान तसेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
मटेरियल मॅनेजमेंट क्षेत्रातील येऊ घातलेल्या नवीन नवीन संकल्पना तसेच कार्यपद्धतीची या सप्ताहादरम्यान सर्वांना माहिती दिली जाते. या सप्ताह दरम्यान मटेरियल मॅनेजमेंट क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे व्याख्यान चर्चासत्रे याचे आयोजन केले जाते. तसेच या क्षेत्रातील आदर्श प्रणालीचा वापर करणाऱ्या उद्योगांना भेटी दिल्या जातात.

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आय आय एम एम छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 18 एप्रिल रोजी इंड्यूरन्स टेक्नॉलॉजी चे विशाल कुलकर्णी यांचे “इम्पॉर्टन्स ऑफ जीएसटी इन सप्लाय चेन” या विषयावर, तर 19 एप्रिल 2024 रोजी इंड्यूरन्स टेक्नॉलॉजीचे फणीकुमार यांचे “इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट रिक्वायरमेंट “या विषयावर, तसेच 21 एप्रिल 2024 रोजी अंजली लॉजिस्टिकचे ललित लोहाडे यांचे “रेंटल अँड रियूजेबल पॅकेजिंग “या विषयावर, 23 एप्रिल रोजी इंड्यूरन्स टेक्नॉलॉजीचे प्रसाद उपाध्याय यांचे “सप्लायर फायनान्शिअल रिस्क असेसमेंट “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
ही सर्व चर्चासत्रे तसेच व्याख्याने आय आय एम एम एक्सलन्स ट्रेनिंग सेंटर खिवनसरा हाय स्ट्रीट, उल्कानगरी, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहेत. तसेच या सप्ताह दरम्यान 22 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता एन्ड्रेस हाऊजर या उद्योग समूहात भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आय आय एम एम छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष सुशांत पठारे यांनी केले आहे.
