March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.25) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट च्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी सुशांत पठारे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत मुळे यांची निवड करण्यात आली. 

आय आय.आय.एम एम.ही मटेरियल मॅनेजमेंट क्षेत्रात कार्य करणारी अग्रणी संस्था असून राष्ट्रीय स्तरावर नियोजन, स्त्रोत, रसदशास्त्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, संशोधन, प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. आय आय एम एम च्या देशभरात सुमारे 52 शाखा तसेच 19 विभाग असून 9 हजार 500 पेक्षा जास्त सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सदस्य मटेरियल मॅनेजमेंट अर्थात साहित्य व्यवस्थापन याच्या प्रचारासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत. या संस्थेमार्फत कार्यशाळा, परिसंवाद, ए आय सी टी ई (AICTE) मान्यता प्राप्त अभ्यासक्रम जसे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवले जातात.

2023 ते 2025 या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे करण्यात आली. याप्रसंगी पुरुषोत्तम मिनहास यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडलेल्या कार्यकारणीत अध्यक्ष सुशांत पठारे, उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, सचिव पारस मुथा, कोषाध्यक्ष ललित लोहाडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय संघई, डॉ.नरेंद्र जोशी, कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, एम फणिकुमार, पंकज महाजन, माजी अध्यक्ष के श्रीहरी यांचा समावेश आहे. याप्रसंगी मावळते अध्यक्ष के श्रीहरी, डॉ.अभय कुलकर्णी, डॉ. नरेंद्र जोशी, श्रीकांत मुळे, पुरुषोत्तम मिनास, सुदर्शन धारूरकर, रमेश जऊळकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट औरंगाबाद विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाचा तसेच प्रशिक्षणाचा उद्योग क्षेत्रातील तसेच शैक्षणिक क्षेत्रातील गरजूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष सुशांत पठारे यांनी याप्रसंगी केले. या प्रशिक्षणासाठी ऑगस्ट होम स्ट्रीट गारखेडा परिसर येथे आय आय एम एम तर्फे सुसज्ज असे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *