March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.28) – राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या हस्ते कलानगर वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिरातील हिंदू धर्म रक्षक गणेश मंडळाच्या गणरायाची आरती मंगळवारी (ता. 26) रोजी करण्यात आली. 

यावेळी वाळूजचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पखोरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण पाठे, घाणेगाव येथील चेअरमन अंकुश काळवणे, आंबेलोहोळ येथील रमेश निश्चित, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाळूज शहरउपाध्यक्ष संजय कांजळे, हिंदू धर्म रक्षक गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल काजळे, श्री गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष आर के कराड, सचिव गणेश जगताप उपाध्यक्ष आनंत वाघ, योगेश चिमखडे, महेंद्र बोराडे, ज्ञानेश्वर आळंजकर, रुस्तुम शेवाळे, रामदास वाघ, नामदेव मोरे, दत्तु इले आदिंसह श्री गजानन महाराज मंदिराचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *