March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.15,) – रांजणगाव (शे.पू) येथील दत्तनगर, पवन नगर परिसरात आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण सोमवारी (ता.15) रोजी करण्यात आले.


रांजणगाव (शेणपुंजी) येथील नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार सतीश चव्हाण यांनी दत्तनगर परिसरातील मारोती मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करण्यासाठी 25-15 योजनेअंतर्गत 10 दहा लाख रुपये तसेच याच परिसरात सी सी रस्ता करण्यासाठी सामाजिक न्याय योजनेअंतर्गत 10 लाख, पवन नगर परिसरात सी सी रस्ता करण्यासाठी 10 लाख असा 30 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ही कामे पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी (ता.15) रोजी करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार मी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. आज या कामाचे लोकार्पण करतांना नक्कीच आनंद होतो आहे. रांजणगाव हा औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र येथील नागरिकांना अद्यापही रस्ते, पाणी, शिक्षण अशा मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. या परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे देखील शासनस्तरावर पाठपुरावा करून विविध योजनेच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन आमदार सतीश चव्हाण यांनी दिले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, गंगापूर-खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड, राजू पाटील डोणगावकर, भारत गरड, मोहिनीराज धनवटे, सुरेश बोकण, मनोहर गवई, अनिस शेख, सुरेश बोऱ्हाडे, विलास सौदागर, रमेश जाधव, समीर शेख, बाळू माकोडे, संजय अंभोरे, कृष्णा कानडे, समीर शेख, संजय मंजुळे, विजय तोगे, प्रकाश टेकाळे, प्रकाश मगरे, बापू येरे, भाऊसाहेब वेताळ, राजू गायकवाड, संदीप पठारे, कृष्णा कानडे, सविताताई शेळके, अनिता काजळकर, शांताबाई पठाडे, अश्विनी पायघन आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *