February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – संस्कार विद्यालय साईनगर सिडको वाळूज महानगर या शाळेत गरजू विद्यार्थ्यांना आमदार संजय शिरसाठ यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटप करण्यात आल्या.

 

यावेळी विजयाताई शिरसाठ, हर्षदा शिरसाठ, नगरसेविका वाडकर ताई, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत साळे, सरपंच सुनील काळे,उपसरपंच ज्योतीताई साळे, दशरथ मुळे, नारायण कुंठे, रमेश पाटील, रमाकांत भांगे, गौरव पाटील उपस्थित होते. या वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे, विभाग प्रमुख राजन सोमासे, विष्णू उगीले, रंगनाथ हानवते, कमलसिंग सुर्यवंशी, अमोल सोमवंशी, प्रल्हाद सुर्यवंशी, चंद्रकांत सोनजे यांच्या वतीने केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन पवार, रमण धवन, शुभम ठाकुर, चंदाताई हानवते व संस्कार विद्यालयातील शिक्षक व सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांनी प्रयत्न केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *