February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.24) – आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपेगांव केंद्र रांजणगांव (पोळ) ता. गंगापूर येथे 24 जानेवारी 2023 रोजी आनंदनगरीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

आपेगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या 1 ली ते 4 थी या छोट्याशा शाळेत विद्याथ्यांनी आनंदनगरीची जोरदार तयारी करून विविध स्टॉल लावले होते. त्यात 2 रुपयात बक्षिस जिंका, गरमागरम समोसे, कचोरी, वडापाव, ब्रेड वडा, शाबुदाना बडा, खमंग ढोकळा, चंपाकली, पकोडे, पाणीपुरी,भेळ, मॅगी, चिंचा, टहाळ, टोमॅटो चिप्स, पॉपकॉर्न, शेंगदाना व राजगिरा चिक्की, शेव, खारे फुटाणे व शेंगदाने अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते. आपले पदार्थ जास्त विकल्या जावे. यासाठी या आनंदनगरीतील विद्यार्थ्यामध्ये जोरदार चढाओड लागली होती.

विद्यार्थांनी आणलेल्या पदार्थांचा विद्यार्थी, पालक, गावकरी, शिक्षक यांनी मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांना गणिती क्रिया व व्यवहाराची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप जाधव यांनी सांगितले.
आनंदनगरीचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश व उपाध्यक्ष खंडू भडक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती सदस्या आरती धनुरे, गिता गिरी, अल्का कुकलारे, पालक कृष्णा चव्हाण, गोविंद आढाव, निवडूक भोसले, काकासाहेब आढाव, सोमिनाथ बडक, ज्ञानेश्वर धनुरे, साखरचंद आढाव, पुष्पा लंके, वैशाली धनुरे, निता धनुरे, शिला चव्हाण, छाया चव्हाण, रंजना भडक, कविता चव्हाण तसेच मोठ्या संख्येने पालक गावकरी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते. या उपक्रमासाठी शिक्षिका शुभांगी रिसे, आशा सेविका पुष्पा काळे, आंगणवाडी शिक्षिका पुष्पा जाधव व शाळेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *