March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9) – राहते घरी 37 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोतवरून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पत्नीसह सासू मेहुना मेहुणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शशिकांत नागेश कांबळे (37) याने साडीच्या सहाय्याने भिंतीच्या खुंटीला लटकुन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.7) रोजी 10 वाजेच्या सुमारास राहते घरी देवगिरीनगर, बजाजनगर येथे घडली. मात्र मयताजवळ मिळालेल्या सुसाईड नोटच्या मजकुरानुसार त्याच्या मरणास त्याची पत्नी आम्रपाली शशिकांत काबळे, मेहुणा सिध्दार्थ मंगलराव साळवे, सासू उषा मंगलराव साळवे व मेहुणी असे नातेवाईक कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 306, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद नितनवरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *