
वाळुज महानगर, (ता 25) – घरात एकटीच असलेल्या 23 वर्षीय विवाहित महिलेला 35 वर्षीय आरोपीने लागली बॅटने मारहाण करून व हात धरून तिचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करत निघून गेला. की घटना गुरुवारी 24 डिसेंबर रोजी दुपारी आंबेलोहळ येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबेलोहळ येथील 23 वर्षीय विवाहित महिला गुरुवारी 24 डिसेंबर रोजी घरात एकटीच असतांना दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी आप्पासाहेब नवले रा. आंबेलोहळ हा घराच्या दाराला लाथा मारुन म्हणाला की, तुम्ही या जागेवरुन निघुन जा असे म्हणाल्याने, ही माझ्या आईची जागा आहे. आम्ही ईथुन जाणार नाही. असे पिढीत विवाहिता म्हणाली. तेव्हा त्याने घरातील कपडे फेकुन दिले व विवाहितेचा हात धरुन विनयभंग केला. तिने ओरडण्याच्या प्रयत्न केला असता त्याने लाकडी बॅटने तिला मारहान केली व शिवीगाळ करत निघुन गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी आप्पासाहेब नवले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
