वाळूजमहानगर, ता.31 – फिरायला गेल्यानंतर काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 16 वर्षीय मुुुलीवर 21 वर्षीय तरुणाने आत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.30) रोजी सकाळी वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व भावासह रांजणगाव (शेणपुंजी) येथील किरायाच्या घरात राहतात. पीडित मुलीने शिक्षण सोडलेले असून ती घरीच राहते. तर तिची आई कंपनीत कामाला जाते. काही दिवसापूर्वी पिढीत मुलीची
निशांत गायकवाड यांच्याबरोबर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे बाहेर फिरायला जाऊ लागले. दरम्यान निशांत याने तिच्यासोबत फोटो काढले. आणि याच फोटोचा गैरफायदा घेत त्याने मुलीला लग्न करण्याची मागणी घालत बुधवारी (ता.30) रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास तो रहात असलेल्या घराच्या गच्चीवर नेऊन अत्याचार केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्याने पीडित मुलीसह आईने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिल्याने आरोपी निशांत गायकवाड वय 21 रा. रांजणगाव यांच्या दोघांना गुन्हा दाखल करण्यात आला.
आईला सुद्धा दिली धमकी –
दरम्यान अत्याचार केल्याची ही घटना उघडकीस येताच आरोपी निशांत याने पीडित मुलीच्या आईला धमकी देत मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून न दिल्यास माझ्यासोबत असलेले मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.