
वाळुज महानगर, (ता.10)- एका अल्पवयीन मुलीचा 19 वर्षीय आरोपी तरुणाने तिच्याशी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने वारंवार पाठलाग करून जवळीक निर्माण केली. हा प्रकार 1 जानेवारीपासून सुरू होता. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुलगी अल्पवयीन आहे, असे माहित असतानाही, रोहित बनकर याने तिच्याशी गैर कृत्य करण्यासाठी तिला वारंवार फोन करून तिचा लैंगिक छळ करण्याच्या उद्देशाने तिचा सतत पाठपुरावा करून तिला भेटायला बोलावून तिच्याशी जवळीक निर्माण केली. हा प्रकार 1 जानेवारी 2024 पासून 9 एप्रिल 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रोहीत मधुकर बनकर वय 19 वर्ष,, रा.मालपुर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात कलम 354 डी भादंवि. सह कलम 7, 8 पोक्सो प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मुळे करीत आहे.
