
वाळूजमहानगर, (ता 6) – बजाजनगर येथील सामजिक कार्यकर्ते तथा जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन, दिल्लीचे मराठवाडा अध्यक्ष अर्जुनराव आदमाने पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (ता.1) रोजी भुमिपुत्र संस्थेच्या वितीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाचे औचित्य साधून भांगसीमाता आश्रम मुलांना वह्या वाटप व खाऊ वाटप तसेच बालगिरी महाराज यांच्या गोशाळेतील गायींना चारा वाटप करण्यात आले. राष्ट्रीय दृष्टीहिन संघ महाराष्ट्र संचलित अंध मुलींच्या प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र (ए.एस.क्लब, वाळूज एमआयडीसी) येथे मुलींना ब्लॅकेट व जेवन देण्यात आले. तसेच बसस्टॅण्ड रेल्वेस्टेन, घाटी येथे अनाथांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. भगवान बाबा आश्रम शाळेमध्ये मुलामुलींना जेवन देण्यात आले. त्या शाळेमध्ये एका अनाथ मुलाची हायटेक कॉलेजमध्ये 22 हजार फी भरण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला अनिल चोरडिया, निलेश सोनवणे, सूर्यभान राऊत, सतिश पाटील, हनुमान भोंडवे, कैलास भोकरे, गणेश पेरे, देविदास जाधव, विष्णु जाधव, आय.जी. जाधव, उषाताई हांडे, सचिन गरड, सतिश हिवाळे आदीची उपस्थीती होती. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पोपटराव आदिक, उपाध्यक्ष काकासाहेब चेळेकर, सचिव रमेश शेळके, कार्याध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, पोपट हांडे, संजय पेरे, कैलास कदम, आसाराम करपे आदींनी परिश्रम घेतले.
