February 5, 2026

वाळुज महानगर (ता.4) – भाविकांसह हजारो कामगार, कामगार कंत्राटदार आणि लघु उद्योजक, जे उत्तर भारतातील मूळचे आहेत, ते छत्रपती संभाजीनगर व वाळूज एमआयडीसीमध्ये राहतात. यांच्या सोयीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून आयोध्येला जाण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यात यावी. अशी मागणी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

माजी खासदार डॉ. भागवत कराड यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मराठवाड्यातून उत्तर भारतातून ये-जा करण्यासाठी रेल्वेची सुविधा अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे प्रवाशाची अत्यंत कुचंबना होते. शिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारमध्ये जाण्यासाठी मनमाड किंवा भुसावळ या लांब अंतरावर रेल्वेमध्ये बसण्यासाठी जावे लागते. त्यामुळे वेळ व पैसा खर्च होतोच शिवाय रेल्वेमध्ये बसण्यासाठी जागाही मिळत नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, उत्तर भारतीय रहिवाशांनी छत्रपती संभाजीनगर ते अयोध्या अशी एक नवीन दैनिक रेल्वे सुरू करण्यात यावी. अशी मागणी भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लेखराज सोळंकी, भाजप यूबीएचएमओचे छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) शहराध्यक्ष नरेंद्रसिंह यादव, शहराध्यक्ष उदय प्रतापसिंग तोमर, शहर (उत्तर विभाग) अध्यक्ष परमानंद शुक्ला, कैलाश यादव, राजेश सिंह, मनोज तिवारी, अरुणकुमार गौड, अमृत सिंह, उपेंद्र श्रीवास्तव, श्रीवास्तव जयंत पाटील आदी उपस्थित होते. पांडे, सूर्यभान माळी, शिवशंकर भारद्वाज, बच्चा सिंग, राजेश पारसनाथ सिंग, अरविंद प्रमोद, संतोष, डॉ.प्रदीप, राहुल अनिल सिंग, अरविंद यादव, राघव वर्मा, अमोल उबाळे, क्रिश कुमार जैस्वाल, विनीत शुक्ला, विशाल तिवारी, सत्यम शुक्ला, रोहित शुक्ला, रोहित शुक्ला, विशाल तिवारी, रोहित शुक्ला, राजेंद्र दुबे, रा. बिपीन श्रीवास्तव आदींनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *