वाळूजमहानगर, ता.22 – दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. 2023 मध्ये 4 लाख 8 हजार अपघात झाले. 2024 चा डाटा अद्याप मिळाला नाही. 2022 मध्ये झालेल्या अपघाताचा आकडा यापेक्षा 20 टक्के कमी होता. अपघाताचा आलेख 2022 पासून वाढत आहे. 2024 मध्येही त्याची संख्या जास्त असू शकते. गेल्या वर्षात 4 लाख 8 हजार झालेल्या अपघातांमध्ये 1 लाख 72 हजार लोकांचा जीव गेला. म्हणजे तासाला 55 अपघात होतात. आणि त्यात 20 टक्के लोकांचा जीव जातो. गंभीर जखमी व कायमचे अपंगत्वाची संख्या वेगळीच आहे.
या अपघातापैकी 78 टक्के अपघात मानवी चुकांमुळे झालेले आहेत. वाहन चालवताना छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्या तर लाखो लोकांचा जीव पर्यायाने आपला व दुसऱ्याचाही वाचवू शकतो. असे उपदेशपर मार्गदर्शन मेटलमॅन ऑटो लिमिटेडचे संचालक आणि सीओओ श्रीकांत मुंदडा यांनी बुधवारी (ता.22) रोजी केले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाळूज औद्योगिक वसाहतीतील मेटलमॅन ऑटो लि.कंपनी व्यवस्थापनाच्या पुढाकाराने वाहन रॅली, जनजागृती, कामगारांना मार्गदर्शन व मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (ता.22) जानेवारी रोजी करण्यात आले होते. मेटलमॅन ऑटो लिमिटेड बी-12 या कंपनीच्या गेटपासून रॅलीला सकाळी 11 वाजता येथून सुरुवात झाली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक प्रमोद सुरशे, वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष मेटलमॅन ऑटो लिमिटेडचे संचालक आणि सीओओ श्रीकांत मुंदडा, मेटलमन ऑटो लि.चे एचआर आणि आयआर हेड तसेच बावा सेफ्टी क्लस्टरचे चेअरमन विजय साळवे, प्लांट हेड अनिलकुमार डहाळे, कृष्णकुमार बीजेमवार, प्रकाश एखंडे, वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके, लुमॅक्स कंपनीचे व्यवस्थापक हेमंत श्रीवास्तव, मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल जाधव, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे व्ही एम बोकरे, जी बी पाचवणे, राजमोहम्मद देशमुख आदींची उपस्थिती होती.
मेटल मॅन ऑटो कंपनीपासून निघालेली वाहन रॅली वाळूज औद्योगिक वसाहतीतील मिडास केअर, जॉन्सन अँड जॉन्सन, एक्सलंट एन्व्हायरो अँड रिसर्च सेंटर, वैष्णोदेवी मंदिर, मोरे चौक मार्गे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे, महाराणा प्रताप चौक, आंबेडकर चौक, एफडीसी कॉर्नर मार्गे रस्ता सुरक्षा व अपघाताबाबत जनजागृती करत पुन्हा कंपनीत आली.
या रॅलीचा समारोप करताना मान्यवरांनी अपघाताबाबत मार्गदर्शन करून अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. व सहभागी झालेल्या विविध कंपन्यातील कामगारांना हेल्मेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन वतनदार, सूत्रसंचालन यशश्री पाटील, तर आभार अनिलकुमार डहाळे यांनी मानले. डॉ. राहुल जाधव यांनी काही प्रात्यक्षिके करून दाखवत जीव कसा वाचवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेटल मॅन ऑटो कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक गजानन वतनदार, विनोद वानखेडे, सुशील देवळे, सचिन घोडके, योगेश चापे, पवन दांडगे, अक्षय शेळके, सुरज रोकडे, प्रतिक्षा चंद्रटिके, प्रकाश साळुंखे, किशोर जगताप, इमरान मिर्झा आदींनी परिश्रम घेतले.
या कंपन्यांनी घेतला सहभाग – या रॅलीमध्ये मेटलमॅन ऑटो लिमिटेडसह लुमॅक्स ऑटो लिमिटेड, यशश्री प्रेस, एफ डी सी इंडिया लिमिटेड, कास्मो फिल्म लिमिटेड, संजीव ऑटो, मॉर्गन लिमिटेड, बडवे इंजीनियरिंग, जॉन्सन अँड जॉन्सन, सीजी पावर अँड इंडस्ट्रियल सो लिमिटेड, मॉर्गनाईट कृषिबल इंडिया लिमिटेड, जेबीएम, फोरबस अँड कंपनी लिमिटेड, अविनाश टेक्नो कासमो कंपोनंट, आर एस पी एल लिमिटेड, उमासन्स ऑटो कॉमप प्रायव्हेट लिमिटेड, वर्षा फोर्जिंग आधी कंपन्यांनी सहभाग नोंदवला.
