March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – सुरक्षित वाहतूक व अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच वाहनाची देखभाल व दुरुस्ती वेळेवर करणेही खूप महत्त्वाची आहे. पोलिसांचा धाक म्हणून नव्हे तर आपला जीव किती महत्त्वाचा आहे, तो कसा सुरक्षित राहील.

यासाठी वाहतुकीचे नियम पाळा. असे आवाहन महामार्ग प्रादेशिक विभागाच्या पोलीस अधिक्षक डॉ अनिता जमादार बजाज नगर येथे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मंगळवारी (ता.23) रोजी केले.


वाळुज वाहतूक शाखा व मोटार चालक कामगार वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बजाजनगर येथे सुरक्षा अभियान 2024 चे आयोजन करण्यात आले होते.सुरक्षितता ही फक्त घोषणा नाही, जीवनाचा एक मार्ग आहे. रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दरवर्षी देशात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा’ 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येतो. याच अनुषंगाने बजाजनगर येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महामार्ग प्रादेशिक विभागाच्या पोलीस अधिक्षक डॉ अनिता जमादार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस एस पवार, वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, मराठवाडा विभाग प्रमुख विजय काकडे, कैलास कासार आदी होते. यावेळी सिंग्नलचे पालन करा, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नका, मद्य सेवन करून गाडी चालवू नका, कानाला हेडफोन लावून गाडी चालवू नका, गाडी चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोकुळ तुपे, मुकेश मंगरोळे, पिंटू घाईट, अविनाश वाटोरे, युवराज मोगल, राम शिंदे, गणेश अंबाडे, इसुफ खान, जे एस मित्तल, मनीष परमार, जयसिंग वर्मा, मुकेश शरावत, वेदप्रकाश चौधरी, अनिल पुनिया, विश्वनाथ मोगल, बाबाराव जाधव, मनीष नावपुते, गजानन धबडगे, रोहित बळवंत, भीमराव दहिफळे आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *