March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.18) – पतीपासून विभक्त झालेल्या 32 वर्षीय विवाहितेला समवयस्क जुन्या प्रेमीने जाळ्यात ओढत एकत्र राहण्याच्या आणाभाका घेऊन सतत नऊ वर्ष बलात्कार केला. दरम्यान त्याने पिडितेकडून व्यवसायासाठी 2 लाख रुपयेसुद्धा उकळले. परंतु आरोपीची माहेरी गेलेली पत्नी परत आल्याने त्याने पीडीत महिलेचा गर्भपात करून तिच्याशी संबंध तोडले. व घेतलेले पैसे न देता पुन्हा पत्नी बरोबर घरोबा केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 32 वर्षीय विवाहिता आणि तिच्या नात्यातील मुलगा सचिन भगवान आदमाने वय-32 वर्षे रा.चिकलठाणा यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र घरच्यांना त्यांचे लग्न मान्य नसल्याने 2012 मध्ये पीडीतेचे लग्न दुसऱ्याबरोबर झाले. त्यानंतर तिला मुलगा झाला. परंतु पती बरोबर तिचे जमत नसल्याने ती माहेरी आई-वडिलांच्या घराजवळ राहू लागली. तिला भेटायला सचिन येत असे. दरम्यान पिढीतेने रिक्षा घेतली आणि ती भाड्याने चालवण्यास दिली. त्यावर लक्ष ठेवण्याचे तिने आरोपीला सांगितले. त्यामुळे त्यांच्यात आणखी जवळीक निर्माण झाली. दरम्यान माझी बायको घर सोडून गेली आहे, तूही एकटीच आहे, तुला चांगली साथ देईल, आपण पुन्हा एकत्र येऊ. असे म्हणून सचिन याने गळ घातली. त्यास तिने होकार दिला.

 

त्यानंतर सचिन आदमाने याने वेळोवेळी तिच्या घरी, त्याच्या घरी व मित्र अशोक यांच्या घरी तिला बोलावून बलात्कार केला. दरम्यान तो तिला मारहाण करत असे, परंतु तिला कोणाचाही आधार नसल्याने ती सहन करत होती. मात्र त्याचे हे कृत्य वाढत गेल्याने तिने त्याच्याशी संबंध तोडून 2019 मध्ये वाळूज परिसरात घर घेतले. त्यानंतरही सचिन वाळूज परिसरात तिच्या घरी येऊन विनवणी करून तिच्याबरोबर राहू लागला. कोरोना काळात ते एकत्र होते. दरम्यान त्याने व्यवसाय करण्यासाठी तिच्याकडून 2 लाख रुपयेसुद्धा उकळले. ते त्याने परत केले नाही. त्यानंतर एका रात्री सचिन हा रात्री तिच्या घरी आला. व पैसे मागितले, तिने नकार देताच त्याने चाकूने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्यानंतर पीडीतेला गर्भ राहिल्याने तिने त्याची बीड बायपास येथे त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्याने तिला गोडगोड बोलून गोळी खायला देत तिचा गर्भपात केला. त्यानंतर काही दिवसांनी सचिनची बायको परत आल्याचे तिला समजले. तसेच सचिन तिला भेटण्याचे टाळु लागला. त्यामुळे ती त्यास विचारणा करण्यासाठी त्याच्या घरी गेली असता त्याची बहिण शिला मिसाळ, निर्मला, त्याची पत्नी राजकल्याणी, त्याचा भाऊ नितिन व त्याची बायको भाग्यश्री यांनी पिडितेला मारहान केली.

याबाबत एम. सिडको पोलीस ठाणेस तक्रार नोंद आहे. त्यानंतर सचिन हा तिला भेटण्याचे टाळत असल्याने व तिने दिलेले पैसे परत न देता, आता तुझा माझा काही संबंध नाही, माझ्या मागे येवु नको. असे सांगुन सोडुन गेला. या प्रकरणी पीडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *